कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी वचनबद्ध.
'बळ एकीचे... नाते माणूसकीचे' हेच ब्रीद वाक्य घेऊन मागील ३० वर्षांपासून ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्था काम करत आहे.
ओंकार स्वरुपा ही केवळ एक संस्था नाही तर एक व्यासपीठ आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सहकाऱ्यांशी समन्वय साधून सहकाऱ्यांच्या सहकार्याने एक रचनात्मक कार्य करावे हा मुख्य हेतू ठेवून संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
संस्थेच्या या जडणघडणीत अनेकांचा वाटा आहे. सर्वांच्या सहकार्याच्या जोरावरच संस्थेने आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत 'माणूसकी हाच धर्म' मानून कार्य केलेले आहे.
संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत येळवी सह पंचक्रोशीतील नागरीकांसाठी अनेक समाजोपयोगी, लोकोपयोगी कार्य केले आहे. यामध्ये तालुक्यातील खेळाडूंसाठी येळवी प्रिमियर लिगचे आयोजन केले, वारकरी दिंडी सोहळा, गणेशोत्सवानिमित्त हिप्नॉटिझमचा कार्यक्रम, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभाग, आरोग्य तपासणी व आहार माहिती कार्यक्रम, मतदान जनजागृती कार्यक्रम, शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धा तसेच तालुकास्तरीय क्रीडार स्पर्धा आयोजित केल्या आहेत. वार्षिक स्नेहसंमेलन, बालविवाह जनजागृती अभियान प्रभागतफेरी, खवय्यांची जत्रा, महापुरुष जयंती व सांस्कृतिक कार्यक्रम अशी विविध नवनवीन उपक्रम राबवून माणूसकीचं नातं आणि एकीचं बळं निर्माण केलेलं आहे...
आज या संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. लहानापासून थोरापर्यंत... येळवीसह पंचक्रोशीतील नागरिकांना संस्था आपलीशी वाटू लागते यामध्ये सारे आले.
ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था गेली ३० वर्षे होऊन अधिक काळ कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत आहे यामध्ये संस्थेच्या वतीने लोकसहभागातून स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाची स्थापना, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबिरे आज, एस.टी महामंडळाचे 'स्मार्ट कार्ड' योजना, कन्यारत्न ठेव योजना, माजी सैनिक, सैनिक पत्नी, अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा सन्मान सोहळा, महिला दिन, जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षा, प्रबोधनात्मक व्याख्यानमाला, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पॅन कार्ड, आधारकार्ड, रेशन कार्ड शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, विविध महापुरुषांची जयंती, सांस्कृतिक कार्यक्रम अशी विविध लोकोपयोगी समाज उपयोगी कामे संस्थेच्यावतीने करण्यात आली आहेत.
गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन, केरळ पूरग्रस्तांसाठी संस्थेकडून मदत, आरोग्य शिबिरा अंतर्गत अनेक गरजूंना मोफत औषध उपचार, 'श्रीं' च्या प्रतिष्ठापनेने वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम, पाणी फौडेशनमध्ये संस्थेचा सक्रिय सहभाग व सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र, लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियमची स्थापना, स्पर्धात्मक परीक्षेसाठी विशेष वर्गाची व्यवस्था. ओंकार स्वरूपा या संस्थेने केंद्र सरकारने ग्रामीण व गरीब गरजू जनतेसाठी 'आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना' चे गोल्डन कार्ड तयार करण्यासाठीच्या शिबिराचे आयोजन.
फॅशन डिझायनिंग कोर्स ५० महिलांना तीन महिन्याकरिता मोफत प्रशिक्षण.
कोरोना काळात विधवा परितक्त्या, एकल महिलांना मोफत दोन महिने पुरेल इतके किराणा साहित्य.
कोरोना संकटकाळात वन विभाग व कृषी विभागांमध्ये गावातील ५० बेरोजगार नागरिकांना रोजगार हमीच्या कामातून काम मिळवून दिले व त्याची रक्कम रुपये रोजगार ३ लाख रूपये त्या लोकांना रोजगार मिळवून दिला.
आमच्या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक मा. अनिल अंकलगी साहेब यांच्या संकल्पनेतून ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज साकार होत आहे. ग्रामीण भागात इंग्रजीचे ज्ञान विद्यार्थ्यास मिळावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाढत्या स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी व आवश्यक असलेले शिक्षण मिळावे म्हणून या प्रशालेची सुरुवात करण्यात आलेली आहे. व त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलींना सायन्ससाठी परगावी न जाता आपल्याच गावात शिक्षण मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अंकलगी साहेबांनी ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची स्थापना केली.
केंद्र शासनाच्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. विविध शासकीय योजनाची माहिती बद्दल संस्थेला जत तहसील कार्यालय यांच्याकडून प्रशस्त पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच जिल्हा सैनिक बोर्ड सांगली यांच्याकडून सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल गौरव पत्र देऊन संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.
संतोष माणिकराव पाटील
सचिव : ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था
मो. ९१३००२३३०७
आमच्या संस्थेच्या कार्याचा तपशील पाहण्यासाठी अहवाल वाचा.
तुमच्या मदतीने आम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचू आणि आपल्या समाजात चांगले बदल घडवू.