ओंकार स्वरूपा फौंडेेशन संस्था

ओंकार स्वरूपा फौंडेेशन गेली ३० वर्षांपासून कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, महिला दिन, सैनिक सन्मान, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कन्यारत्न योजना, आधार/पॅन/रेशन कार्ड शिबिरे, लहान मुलांसाठी कार्यक्रम, एस.टी. स्मार्ट कार्ड योजनेसह अनेक उपक्रम घेतले गेले. महिलांसाठी मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, गरजूंना औषधे व किराणा साहित्य, व बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात मदत केली. कोरोना काळात संस्थेने ५० बेरोजगारांना रोजगार हमीच्या कामातून ३ लाखांचा रोजगार मिळवून दिला. संस्थेच्या पुढाकाराने इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. मुलींसाठी गावातच सायन्स शिक्षण मिळावे म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थेला केंद्र शासन, तहसील कार्यालय व जिल्हा सैनिक बोर्डाकडून गौरव व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या सर्व कार्यामागे सचिव संतोष माणिकराव पाटील व मार्गदर्शक अनिल अंकलगी यांचे महत्वाचे योगदान आहे.

Decorative Image

संस्थेची माहिती

अनिल अंकेलगी
अनिल अंकलगी

मार्गदर्शक

संतोष माणिकराव पाटील
संतोष माणिकराव पाटील

संस्थापक व सचिव

ओंकार स्वरूपा फौंडेशन कार्यालय
ओंकार स्वरूपा फौंडेेशन

कार्यालय

"बळ एकीचे... नाते माणुसकीचे"

या ब्रीदवाक्याने ओंकार स्वरूपा फौंडेशन मागील ३० वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. पंचक्रोशीतील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, क्रीडा स्पर्धा, दिंडी, चित्रकला स्पर्धा, जनजागृती मोहिमा आयोजित केल्या. संस्थेने माणुसकीचे नाते जोपासत एकीचं बळ निर्माण केले आहे. आज ही संस्था वटवृक्षासारखी बहरली असून समाजाच्या सेवेस कटिबद्ध आहे.

अधिक वाचा

कार्यक्रम / उपक्रम

शैक्षणिक उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा इ. उपक्रम राबविण्यात येतात.

आरोग्य सेवा

विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरे, औषध वितरण, रक्तदान शिबिरे व इतर आरोग्य संबंधित मार्गदर्शन.

सांस्कृतिक कार्यक्रम

विविध सण, राष्ट्रीय सोहळे, सांस्कृतिक स्पर्धा व कला प्रदर्शन यांचे आयोजन.

क्रीडा स्पर्धा

विविध खेळ स्पर्धा, क्रीडा स्पर्धा स्पर्धांचे आयोजन व पुरस्कार वितरण.

सामाजिक जागृती

स्वच्छता मोहीम, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व इतर सामाजिक जागृतीचे कार्यक्रम.

महिला सक्षमीकरण

महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंसहाय्य गट, व्यवसाय प्रशिक्षण इ. उपक्रम.